Breaking News

पोटनिवडणुकीतील विजयानंतर केजरीवाल यांनी मानले मतदारांचे आभार

नवी दिल्ली, दि. 29, ऑगस्ट - दिल्लीतील बावना विधानसभा मतदार संघातील विजयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून सर्व मतदारांचे आभार  मानले. आम आदमी पक्षाकडून स्वच्छ हेतूने केले जाणारे राजकारण आणि गेल्या अडीच वर्षांत पक्षाने केलेल्या कामाला या पोटनिवडणुकीत मतदारांनी पोचपावती  दिली आहे, असेही केजरीवाल म्हणाले.
या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार राम चांदेर विजयी झाले. आम आदमी पक्षाच्या आमदारांना विकत घेतले जाऊ शकत नाही, अशा शब्दांत  केजरीवाल यांनी पोटनिवडणुकीतील विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली.
आम आदमी पक्षाचे आ. वेद प्रकाश यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. यानंतर या पोटनिवडणुकीची घोषणा झाली. त्यामुळे आम आदमी  पक्षासाठी ही निवडणूक जिंकणे महत्त्वाचे मानले जात होते. आम आदमी पक्षाचे उमेदवार चांदेर यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार वेद प्रकाश यांनी 24 हजार मतांनी  पराभव केला.