Breaking News

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी कार्ती चिदंबरम यांची दुस-यांदा सीबीआयमार्फत चौकशी

नवी दिल्ली, दि. 29, ऑगस्ट - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चिदंबरम यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दुस-यांदा  चौकशी केली. आज सकाळी 11.30 च्या दरम्यान कार्ती अन्वेषण विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. भास्कर रमण, रवी विश्‍वनाथन आणि  मोहनन राकेश या तिघांचीही अन्वेषण विभागाने चौकशी केली, अशी माहिती अन्वेषण विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना कार्ती यांनी आर्थिक गैरव्यवहार करून पीटर मुखर्जी यांच्या मीडिया कंपनीला मंजुरी दिली होती.
दरम्यान, 23 ऑगस्ट रोजी या प्रकरणी अन्वेषण विभागाने कार्ती यांची चौकशी केली होती. कार्ती यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल  दाखल करण्यात आला होता. सरकार आपल्या मुलाला लक्ष्य करून राजकीय षडयंत्र रचत असल्याची प्रतिक्रिया पी. चिदंबरम यांनी दिली.