Breaking News

देशात कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही - बाबा रामदेव

नवी दिल्ली, दि. 29, ऑगस्ट - देशात कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. हे आज न्यायालयाने सिद्ध केले आहे, अशी प्रतिक्रिया योग गुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त  केली. बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने आज 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा  सुनावली. या पार्श्‍वभूमीवर बाबा रामदेव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. रामदेव यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
गेल्या 2 ते 3 वर्षांपासून काही साधू संतांवर बलात्काराचे आरोप केले जात आहे. मात्र, आरोप सिद्ध झाल्याशिवाय त्यांना दोषी ठरवू शकत नाही. जर कोणी चुकीचे  काम करत असेल तर, कायदा नक्कीच त्याला शिक्षा देणार, असेही रामदेव यांनी नमूद केले.