Breaking News

आंध्र प्रदेश विधानसभेच्या पोटनिवडणुकीत टीडीपीचे भूमा ब्रह्मानंद रेड्डी विजयी

हैदराबाद, दि. 29, ऑगस्ट - आंध्र प्रदेशमधील नंद्याळ मतदार संघातील पोटनिवडणुकीत तेलगु देसम पक्षाचे भूमा ब्रह्मानंद रेड्डी 27 हजार 466 मताधिक्क्यांनी  विजयी झाले. रेड्डी यांना 97 हजार 76 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शिल्पा मोहन रेड्डी यांना 69 हजार 610 मते  मिळाली असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. दिवगंत आ. भूमा नागी रेड्डी यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.