Breaking News

आसाराम बापू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले

नवी दिल्ली, दि. 29, ऑगस्ट - बलात्काराचा आरोप असलेले आसाराम बापू यांच्या खटल्याच्या सुनावणीत इतकी दिरंगाई का असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने गुजरात  सरकारला विचारला. न्यायालयाने गुजरात सरकारला प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेशही दिला आहे.
आसाराम बापू गेले चार वर्षांपासून तरुंगात असून अद्यापही पीडित महिलेची साक्ष का घेण्यात आली नाही ?, असे विचारल्यावर साक्षीदारांचा जबाब नोंदविण्यात येत  असून आतापर्यत 29 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. जबाब नोंदविणा-या दोन साक्षीदारांची हत्या करण्यात आली तर काही जण जखमी झाल्याचे  गुजरात सरकारने न्यायालयात सांगितले.
आसाराम बापू यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आरोप करणा-या पीडित महिला आणि इतर  साक्षीदारांचा जबाब नोंदवण्याचा आदेश दिला होता. परंतु 40 साक्षीदार असून अद्याप त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही.