Breaking News

कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमध्ये पर्यावरणपूरक श्रीगणेशाची स्थापना

बुलडाणा, दि. 28, ऑगस्ट - शहरातील नामांकित लक्ष्मीनारायण संस्थेने दरवर्षीप्रमाणे यंदाही कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमध्ये गणेश चतुर्थीला ढोलताशाच्या निनादात व  गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात पर्यावरणपूरक श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. संस्थाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान व संचालिका सौ. राजकुमारी चौहान यांच्या हस्ते  विधिवत पूजा करून श्रींची स्थापना करण्यात आली. मागील वर्षी संस्थेला महाराष्ट्र शासनाद्वारा आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक सजावट स्पर्धेमध्ये तालुक्यातुन  द्वितीय क्रमांक मिळविला होता. यावर्षी राज्यस्तरापयर्ंत धडक देण्याचा संस्थेचा मानस आहे. त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  यवेळी  समस्त कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.