Breaking News

उघड्यावर सर्रासपणे विकल्या जातात खाद्यपदार्थ!

नागरिकांच्या जीवाशी खेळ: अन्न व औषध प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

बुलडाणा, दि. 28, ऑगस्ट - अन्न व औषध प्रशासनाच्या अर्थपुर्ण दुर्लक्षामुळे जिल्ह्यात सर्वत्र सणासुदीच्या काळात खाद्य पदार्थ सर्रासपणे उघड्यावर विकल्या जात  आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी हॉटेल चालक व विक्रेते खेळ खेळत असल्याचे दिसून येत आहे. 
हॉटेल मालक व विक्रेते आपला व्यवसाय व्हावा, या दृष्टीकोणातून नागरिकांना आकर्षित करण्यासाठी शेव, चिवडा, भजे, कचोरी, आलुवडा, मुंगवडा असे तळीव  पदार्थ कढईतून काढून लोकांना दिसतील असे उघड्यावरच ठेवतांना दिसत आहेत. या उघड्या पदार्थांवर दिवसभर घाणेरड्या माशा, रस्त्यावरील वाहनांमुळे उडणारी  धुळ, वाहनांचा धुर, मातीच्या बारीक कणाचा थर या उघड्या पदार्थांवर येवून साचतो. अनेकदा ग्रामीण भागातून येणारे नागरिक कामानिमित्त लवकर निघाल्याने  शक्यतो उपाशी तापाशी येतात. काहीजण घरुनच पोळ्यांचा डब्बा बांधून आणतात. आणि शहरात आल्यावर नास्ता व जेवन करण्यासाठी दिसेल त्या हॉटेलमध्ये  घुसतात. तेथे उपलब्ध असलेले खाद्य पदार्थ मागतात. हॉटेल मालक लगेच भजे, मुंगवडा, आलुवडा, मिसळपाव, पाव वडा या पैकी काहीतरी देवून ग्राहकांचे समाधान  करतात. परंतु हे अन्न आहे का विष? हे कळण्याइतपत समजदार हे नागरिक नसतात. त्यांना अन्न पदार्थाऐवजी घाणेरडे अन्न पदार्थ दिल्या जातात. आणि सर्रासपणे  खातातही परंतु असे पदार्थ खाल्याने अनेकांच्या आरोग्यास बिघाड होते. काहिंना तर आरोग्याचा इतका प्रादुर्भाव वाढतो की ते मृत्युच्या दारेतही जातात. अल्सर, केस  गळणे, डोकेदुखी, ताप, थायरॉईड, दमा, मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, पेशी कमी जास्त होणे, अ‍ॅलर्जी, पोटशुळ, भोवरी, मलवरोध, मलोत्सर्ग, मस्तिष्का, वरणशोध,  वायुविकार, सर्दी, त्वचारोग, ह्दयरोग, कर्करोग, हाडांचे रोग, घाशाचे आजार, तोंड दातांचे आजार, लैंगिक समस्या व रोग, किडणी स्टोन, कंबरदुखी इत्यादी  आजारांमध्ये सध्या वाढ झाली असून जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांसह खाजगी दवाखाण्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. म्हणून सर्व सामान्यांनी उघड्यांवर  अन्न पदार्थ खाणे टाळावे. व अन्न व औषध प्रशासनाने या गंभीर बाबींकडे डोळेझाक न करता अर्थार्जनाचा फायदा न साधता सर्रासपणे उघड्यावर खाद्य पदार्थ विक्री  करणार्‍या हॉटेल धारकांवर कडक व कायदेशीर अन्नसुरक्षा आणि मानके कायद्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही करणे अपेक्षित अहे. याबाबत प्रचार प्रसार करणे काळाची  गरज आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्यामध्ये बिघाड होवून आरोग्य समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या संपूर्ण प्रकाराकडे अन्न व औषध  प्रशासन तात्काळ काही कार्यवाही करणार का? याकडे सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागले आहे.