Breaking News

सातत्याने प्रयत्न केल्यास स्पर्धा परीक्षेत यश निश्‍चित मिळते : एसीपी सोमनाथ वाघचौरे

शिवाजी सायन्समध्ये स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

बुलडाणा, दि. 28, ऑगस्ट - जिल्हा नागरिक डळ व श्री शिवाजी सायन्स कॉलेज, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 24 ऑगस्ट रोजी शिवाजी सायन्स येथील  सभागृहात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचेआयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य बबनराव तायवाडे होते. तर कार्यशाळेचे  उद्घाटन प्राचार्य देवेंद्र बूरघाटे यांच्या हस्ते झाले.यावेळी वक्ते म्हणून गुन्हे शाखेचे एसीपी सोमनाथ वाघचौरे, मार्गदर्शक म्हणून आकार फाऊंडेशनचे संचालक राम वाघ  तसेच व्यासपीठावर माजी प्राचार्य नामदेवराव सास्ते, मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद खरसाने, अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील, गणेश केदार, अनंत भारसाकळे, हरीश ठाकरे, वामन  शास्त्री, मुकेश गुजराथी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी एसीपी वाघचैरे म्हणाले की, माझा जन्म दोन हजार लोकवस्ती असलेल्या नाशिक जिल्हयाचा खेडेगावात एका निरक्षर शेतकरी कुटुंबात झाला. याच  परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण करावे लागले. यातूनच प्रेरणा घेवून स्पर्धा परीक्षेचे ध्येय निश्‍चित करून आपल्या कार्याचा प्रारंभ केला.  सतत 15-16 तास अभ्यास  आणि सामान्य ज्ञानासाठी आवश्यक ती ज्ञानसाधना व देशासेवेची भावना मनात ठेवून प्रयत्न केल्यामुळेच मी बैलबंडीतून सरळ पिवळया दिव्याचा गाडीत बसू शकलो  असे त्यांनी सांगितले. त्यांनी स्पर्धा परीक्षा तयारीची हातोटी विद्यार्थ्यांसमोर साध्या भाषेत मांडली. तसेच सातत्याने प्रयत्न केल्यास निश्‍चित स्पर्धा परीक्षेत यश मिळवू  शकता असा विश्‍वास विद्यार्थ्यांना त्यांनी दिला. तर प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी शिवाजी सायन्स कॉलेज आणि धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये सर्व स्थरातील  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी सामाजिक जाणिवेतून केलेल्या उपाययोजनेची माहिती देत असतानाच त्यांचा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र तयार केले  असून पन्नास हजार पुस्तकांचे ग्रंथालय तयार केले असल्याचे सांगून सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. श्रीराम वाघ यांनी ध्येय निश्‍चित करून  मनापासून प्रयत्न केल्यास व अभ्यासात सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षा मुळीच कठीण नाही, असे सांगितले.
विद्यार्थ्यांनी स्वता:ची क्षमता लक्षात घेवून एखादे व्यक्तिमत्त्व डोळयापूढे ठेवून ध्येय निश्‍चीत केल्यास यश संपादित करता येवू शकते असे मत श्रीराम वाघ यांनी व्यक्त  केले. यशस्वीतेसाठी प्रा. गणेश केदार, अनंत भारसाकळे, हरीश ठाकरे, वामन शास्त्री, मुकेश गुजराथी, भगवान मूंढे, लिना पाटील, स्वप्नील साखरे, रमेश सास्ते  यांनी प्रयत्न केले.संचालन हरीश ठाकरे यांनी तर आभार अनंत भारसाकळे यांनी मानले.