Breaking News

’महिलांचे आरोग्य व आहार’ विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. 23, ऑगस्ट - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘महिलांचे आरोग्य व आहार’ या विषयावर डॉ. शारदा  निर्मल-महांडुळे यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत बुधवार 23 आणि गुरुवार 24 ऑगस्ट रोजी  सकाळी 7:25 ते 7:40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना आपल्या आरोग्यासंबंधीत विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी महिलांनी आपले आरोग्य कशा पध्दतीने  सांभाळावे,आपला आहार कसा असावा, वयाच्या प्रत्येक टप्यात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयावर सविस्तर माहिती डॉ. शारदा  निर्मल-महांडुळे यांनी दिलखुलास या कार्यक्रमात दिली आहे.