बद्रिनाथकडे जाणार्या मार्गावर दरड कोसळल्यामुळे वाहतुक ठप्प
नवी दिल्ली, दि. 28, ऑगस्ट - बद्रिनाथच्या दिशेने जाणा-या मार्गावरील चामोली भागात आज दरड कोसळल्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली. रस्त्यावरील ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. वाहतूक ठप्प झाल्यामुऴे केदारनाथ-बद्रिनाथकडे जाणा-या मार्गावर भाविक अडकले आहेत. पावसामुळे या मार्गांवर नेहमीच दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात.
मागील आठवड्यातही हृषिकेश-बद्रिनाथ महामार्गावर विष्णूप्रयाग जवळ दरड कोसळली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडून चारधामला निघालेले शेकडो यात्रेकरू अडकून पडले होते.
मागील आठवड्यातही हृषिकेश-बद्रिनाथ महामार्गावर विष्णूप्रयाग जवळ दरड कोसळली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडून चारधामला निघालेले शेकडो यात्रेकरू अडकून पडले होते.