Breaking News

गुरमीत राम रहिम यांना सुनारिआ तुरूंगातच शिक्षा सुनावली जाणार

चंडीगड, दि. 28, ऑगस्ट - गुरमीत राम रहिम यांना शिक्षा सुनावण्याची कार्यवाही रोहतकमधील सुनारिआ तुरूंगातच केली जावी असे निर्देश पंजाब-हरियाणा उच्च  न्यायालयाने दिले आहेत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती जगदीप सिंग सोमवारी राम रहिम यांना शिक्षा सुनावणार आहेत.
न्यायिक अधिका-यांच्या सुरक्षित हवाई प्रवासासाठी आवश्यक व्यवस्था पुरवण्याच्या सूचना उच्च न्यायालयाकडून प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. डेरा सच्चा  सौदाच्या अनुयायींकडून शुक्रवारी येथे जाळपोळ व तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारात आत्तापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला. त्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाने हा  निर्णय घेतला. या प्रक्रियेसाठी सुनारिआ तुरूंगात सर्व आवश्यक त्या सुविधा पुरवण्याचे निर्देशही न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत.