Breaking News

रोटरी हा श्रीमंत मनाच्या माणसांचा क्लब : आ. थोरात

अकोले, दि. 08 - रोटरी हा  श्रींमंतांचा  नव्हे तर श्रीमंत मनाच्या माणसांचा क्लब  आहे. सरकारच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम रोटरी ने करावे असे आवाहन राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
अकोले येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या रोटरी क्लबचा सनद प्रदान व  पदग्रहण  सोहळा  येथील  के. बी. दादा सभागृहात संपन्न झाला. या शानदार सोहळ्याला तालुकयातील मान्यवरांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आ.थोरात  बोलत होते. व्यासपिठावर  आमदार वैभवराव पिचड, ज्येष्ठ पत्रकार  अनंत पाटील, नगराध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ, माजी प्रांतपाल प्रमोद पारीख, पुणेचे माजी प्रांतपाल मोहन पालेशा, अकोले रोटरी क्लबचे  नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य, सचिव सचिन आवारी ,संगमनेरचे अध्यक्ष भारतभूषण नावंदर,माजी अध्यक्ष व अकोले चे क्लब एडव्हायजर सुनील कडलग हे उपस्थित होते.
 आ.थोरात म्हणाले की, रोटरी हा गरिबांसाठी काम करणारा श्रीमंत माणसांचा क्लब असलयाचे म्हंटले जाते मात्र तसे नसून हा श्रीमंत मनाच्या माणसांचा क्लब आहे. रोटरी क्लब मध्ये सहभाग घेणार्‍यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच झळाळी प्राप्त होत असते.संगमनेर रोटरी क्लब ने नेत्र रुग्णांच्या बाबतीत केलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. अकोले रोटरी क्लब ही असेच वैशिष्ट्य पूर्ण काम करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आ. वैभवराव पिचड यांनी  पोलीओ  निर्मूलनाच्या संदर्भात रोटरी क्लब ने जागतिक स्तरावर केलेले काम उल्लेखनीय असल्याचे  सांगितले.अकोले  क्लबने  पद्ग्रहन समारंभा पूर्वीच आपल्या कामास सुरुवातही केली आहे. कळसूबाईच्या शिखरा एव्हडी उंची गाठणारे काम या क्लब कडून व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ पत्रकार अनंत पाटील  यांनी रोटरी  क्लब  च्या इतिहासाचा आपले भाषणात मागोवा घेतला.1905 साली रोटरी क्लब ची सथापणा झाली. आज 2017 साल आहे.112 वर्षात रोटरी ने बरेच बदल अनुभवले.धर्म,वंश, जात,रंग,प्रांत याला थारा न देता रोटरीचे कार्य सुरू आहे.आपल्या देशाने विविध बाबतीत प्रगती केली असली तरी आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात असमाधानाचे वातावरण जाणवते.समाजातील अस्वस्थता आणि समाजाला भेडसावणारे नैराशय या विषयावर रोटरी क्लब ने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
मावळते प्रांतपाल प्रमोद पारीख यांनी रोटरी डिस्ट्रिट 3132 च्या कामाचा आढावा घेतला. मराठवाड्यामध्ये दुष्काळी वर्षात जलसंधारणाच्या कार्यासाठी 14 कोटी रुपये खर्च केले. नगर मध्येही लवकरच शेतकर्‍यांसाठी कृषी साधनांची बँक 50 लाख रुपये खर्च करून सुरू करण्यात येणार आहे. वर्षभरात 1500 शाळांमध्ये डिजिटल स्कुल सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  स्वखर्चाने तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेला ग्रंथालय देण्याची घोषणा त्यांनी केली.
नगरपंचायतचे नगराध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ म्हणाले, केवळ नेत्र तपासणीला प्राधान्य न देता गरीबांच्या सेवेला प्राधान्य द्यावे.
मोहन पालेशा यांच्या ओघवत्या शैलीतील भाषणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले की, आज सामाजिक जाणिवा वाढल्या  असल्या तरी व्यक्तिगत संवेदना मात्र बोथट झाल्या आहेत. वृध्दाश्रम पंचतारांकीत होत असतांना वयोवृध्द आईवडील मात्र पोटच्या मुलांनी नाकारल्याने आगतिक बनत आहेत. आनंद मिळविण्यात विवेकाचा अभाव आलेला आहे, मात्र अशाही स्थितीत हातांना देण्याची सवय लावण्याचे काम सर्वांनी करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
रोटरीचे पहिले अध्यक्ष अमोल वैद्य यांनी स्वागत करुन वर्षभरात राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रास्तविक क्लब सल्लागार सुनिल कडलग यांनी  केले. सुत्रसंचालन दिपक महाराज देशमुख यांनी केले. संगमनेर रोटरीचे अध्यक्ष भारतभुषण रावंदर यांनी कार्यक्रमाची कॉल टु ऑर्डर केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोटरीच्या अमृतरत्न या बुलेटीनचे प्रकाशन करण्यात आले व सर्व सदस्यांना नुतन अध्यक्षांच्या हस्ते रोटरी पीन प्रदान करण्यात आली. रोटरीचे सचिव सचिन आवारी यांनी आभार मानले.