Breaking News

मॅडम तुसाँ संग्रहालयात पंतप्रधान मोदी व अब्दुल कलाम यांचा पुतळा

नवी दिल्ली, दि. 28, ऑगस्ट - दिल्लीतील रीगल इमारतीतील मॅडम तुसाँ संग्रहालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा मेणाचा पुतळा  उभारला जाणार आहे. मोदी आणि कलाम यांच्यासह संग्रहालयात महात्मा गांधी, भगत सिंग, सुभाष चंद्र बोस आणि सरदार पटेल यांचाही मेणाचा पुतळा उभारण्यात  येणार आहे.
लंडनमधील मॅडम तुसाँ संग्रहालयाच्या एका विशेष टीमने पुतळा बनविला आहे. प्रभावशाली आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व योगदान देणा-या नेत्यांचा  मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे.