यंदाही चिखलीत इको फ्रेण्डली गणेशमूर्तीची स्थापना
बुलडाणा, दि. 27, ऑगस्ट - गत तीन वर्षांपासून इको फ्रेण्डली गणेश मूर्ती बनविण्याचे आगळेवेगळेपण अंगीकारणार्या सहकार्य गणेश मंडळाने यंदाही इको फ्रेण्डली गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. स्वच्छ भारत, सुंदर भारत अंतर्गत पर्यावरणाचा संदेश देण्याकरिता सहकार्य गणेश मंडळाने सुद्धा यंदाही इको फ्रेंडली गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे.
विदर्भाचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस हे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत होते. परंतु काही दिवसांपासून हे पीक कमी प्रमाणात शेतकरी वर्ग घेत असून आजही विदर्भासह मराठवाड्यात कापसाचे पीक घेण्यात येते. यावर्षी सहकार्य गणेश मंडळाने पूर्णपणे कापूस 5 किलो, कागद 5 किलो, पुठ्ठा 2 किलो , मोर पंख 100, जुन्या पत्रावळी 100, बांबुच्या काड्या 30, कपडा 5 मीटर, डिंक 1 लिटर, सुतळी 1 पाव, दोरा 3 बंडल, दाभण, सुई यांचा वापर करून सदर मूर्तीची स्थापना केली आहे. मंडळाचे सदस्य पंकज भारद्वाज यांनी आपल्या कल्पनेतून ही सदर मूर्ती साकारली असून मंडळाचे अध्यक्ष प्रसाद सोळंकी यांनी सदर मूर्ती साकारण्यास त्यांची मदत केली आहे.
या मूर्तीची स्थापना विधीवतपणे पूजा, अर्चना करून साकारण्यात आली असून यावेळी सहकार्य गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रसाद सोळंकी, निलेश भुसारी, निलेश रिंढे, श्रीकांत सोळंकी, स्वप्नील पाटील, मकरंद भटकर, अमोल इंगळे, अशोक मोरे, श्रेयश हरलालका, पंकज जोशी, पंकज भारद्वाज, सुनिल भराड, नितीन जांगीड, चेतन नागवाणी, संदीप वाघमारे, वचन वायकोस, निखील खरपास, कुणाल नागवाणी, ऋषिकेश सुरडकर, निलेश भुसारी, सुचित भराड, नितीन वराडे, पंकज सोळंकी, जयेश बेलोकार, शुभम वायकोस, गोपाल राजपूत यांच्यास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.