Breaking News

रायपुर येथे स्वाभिमान जागृती रॅली व शोषीत वंचित कष्टकर्‍यांचा मेळावा उत्साहात संपन्न

बुलडाणा, दि. 27, ऑगस्ट - जगविख्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तीमत्व, विचारवंत, साहित्यिक, कवी कलावंत, प्रबोधनकार व समाजसुधारक लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाचे निमित्ताने स्वाभिमान जागृती रॅली व शोषीत वंचित कष्टकर्‍यांचा मेळावा आज 26 ऑगस्ट रोजी चिखली तालुक्यातील रायपुर येथील जि.प.प्राथमिक शाळेमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
समस्त मातंग समाज बांधवाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन साप्ताहिक एक नजरचे संपादक छोटु कांबळे हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसपा नेत्या सौ.गयावती घाडगे, स्वाभिमानी जागृती रॅलीचे नेतृत्व लहुशस्त्र सेनाप्रमुख संजुबाबा गायकवाड यांनी केले. मेळाव्याचे मार्गदर्शक विदर्भ खांदेश मातंग सेवासंघाचे अध्यक्ष मा. राजूभाऊ मानकर हे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जनशक्ती कार्याध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील, अजाबराव साळवे, दिनकरराव रणबावळे, सुनील  गायकवाड, अशोक काकडे, गणेश अंभोरे, मोहन मेहेत्रे, भगवान देशमुख, विजय गवई, सुनिल सुरडकर, शाहिर नाना परिहार, दिलीप काळे, आकाश डोणगावकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच मातंग समाजातील जेष्ठ गणमान्य व्यक्तींचीही यावेळी अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा.सौ.नंदाताई लोंखडे, भाई कैलास सुखधाने, एल.के.मानवतकर, प्रभातजी खिल्लारे, लाभले होते. स्वाभिमानी जागृती रॅलीत व शोषीत वंचित कष्टकर्‍यांच्या मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमात साप्ताहिक एक नजरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक व आयोजक साप्ताहिक एक नजरचे कार्यकारी संपादक अ‍ॅड.गुणवंत नाटेकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. यावेळी तोताराम घाडगे, वसंतराव घाडगे, योगेश घाडगे यांच्यासह बहुसंख्य समाजबांधवानी सहभाग नोंदवला.