Breaking News

मराठा मोर्चासाठी लाखो समाज बांधव मुंबईत

मुंबई, 09 . ऑगस्ट - विविध मागण्यांसाठी आज मुंबईत काढण्यात येणार्‍या मराठा समाजाच्या मोर्चासाठी लाखो समाज बांधव मुंबईत दाखल झाले आहेत.  सकाळी 11 वाजता भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून मोर्चाला प्रारंभ होणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून वाहने येत असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक  कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. पश्‍चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व मुक्त मार्ग या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. नवी मुंबई, चेंबूर आदी ठिकाणी वाहने लावण्याची  व्यवस्था करण्यात आली आहे. उपनगरी रेल्वेतूनही मोठ्या संख्येने मोर्चेकरी मुंबईत दाखल होत आहेत.