Breaking News

मूक मराठा मोर्चाला भायखळ्यातील जिजामाता बागेपासून प्रारंभ

मुंबई, 09 . ऑगस्ट - भायखळा येथील जिजामाता बागेपासून प्रचंड उत्साहात सकाळी अकरा वाजता मूक मराठा मोर्चाला प्रारंभ झाला. अत्यंत शिस्तबद्ध  पद्दतीने मोर्चेकरी आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाले . या मोर्चासाठी लक्षावधी मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत . हा मोर्चा दुपारी 2 वाजेपर्यंत आझाद  मैदानात दाखल होईल. जे. जे. उड्डाणपूल मार्गाने हा मोर्चा आझाद मैदानात जाईल. अनेक मोर्चेकरी हे थेट आझाद मैदानात सकाळपासूनच दाखल झाले आहेत. या  मोर्चामुळे मुंबईतील वाहतुकीची कोंडी झाली होती. मोर्चासाठी अनेक मार्गांवरील वाहतुकीचा मार्ग बदलल्याने वाहतूक कोंडीचे दृश्य ठिकठिकाणी दिसत होते. युवक ,  युवतींची मोठी संख्या हे या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले आहे.