Breaking News

फुटीरतावादी नेता शब्बीर शहाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नवी दिल्ली, दि. 23, ऑगस्ट - दहशतवाद्यांना अर्थसाह्य केल्याप्रकरणी तुरूंगात असलेला काश्मीरमधील फुटीरतावादी नेता शब्बीर शहा याचा जामीन अर्ज  दिल्लीतील एका स्थानिक न्यायालयाने फेटाळून लावला.
मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी शब्बीर शहा याला सक्तवसुली संचलनालयाने श्रीनगरमधून अटक केली. अनेकदा  चौकशीसाठी संचलनालयाने शहाला समन्स बजावले होते. मात्र, शहाने या समन्सला एकदाही उत्तर दिले नव्हते. यानंतर न्यायालयाने शहाविरूद्ध  अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.