Breaking News

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुस्लीम वैयक्तिक कायदेमडंळाचा पाठिंबा

लखनौ, दि. 23, ऑगस्ट - तिहेरी तलाक संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे अखिल भारतीय मुस्लीम वैयक्तिक कायदेमंडळाकडून  स्वागत करण्यात आले आहे . त्याबरोबरच या संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मुस्लीम महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना  करण्यात याव्यात, अशी मागणीही मुस्लीम वैयक्तिक कायदेमंडळाकडून करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात कायदा करण्याच्या दिलेल्या सुचनेमुळे आम्ही आनंदी आहोत. या प्रकरणी सरकार कायदा करत आहे की नाही याकडे  न्यायालय लक्ष पुरवेल, अशी आशा आहे. कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मुस्लीम महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना केली जावी,  जेणेकरून महिलांना याचा त्रास भोगावा लागणार नाही, असे मत कायदेमंडळाच्या सदस्या शायिस्ता अंबर यांनी व्यक्त केले.