दुजानाचा मृतदेह देण्यासाठी पाकच्या उच्चायुक्तांशी संपर्क
श्रीनगर,दि२ : जम्मू
-काश्मीरच्या पोलिसांनी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांशी संपर्क साधून दहशतवादी अबु दुजानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले आहे. अबु दुजाना याच्या कुटुंबियांना शेवटचे त्याला पाहावे असे आम्हाला वाटत होते. म्हणून आम्ही पाकिस्तानच्या उच्चायुक्तांशी संपर्क साधला आहे. जर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नाही तर आम्ही त्याच्यावर अंतिम संस्कार करु असे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितले. तर, दुजानाचा मृतदेह स्थानिकांकडे द्या असे सांगण्यात येत आहे. मात्र अंत्यसंस्कारासाठी नागरिकांकडे मृतदेह सोपवण्यास पोलिसांनी विरोध केला आहे. ’लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर असलेला अबु दुजाना हा मंगळवारी सकाळी पुलवामातील काकापोरा येथे झालेल्या चकमकीत ठार झाला. दुजाना हा पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तान भागात राहत होता असे सांगण्यात येत आहे.