मोपलवारांच्या ‘समृध्दी’ अधिग्रहणावर प्रश्नचिन्ह ?
विधानसभेत खडाजंगी; एक महिन्यात चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई: रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यावरील आरोपांची एक महिन्यात चौकशी करू, या चौकशीत ते दोषी आढळले तर त्यांना पदावरून हटवले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली.
मोपलवार यांच्यावर ‘समृद्धी’ महामार्गाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाचे आंदोलक शेतकर्यांच्या ग्रुपवर एक ऑडिओ क्लिप फरत आहे. शेतकर्यांच्या मते या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरु आहे. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून मोपलवार यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोपलवार यांच्यावरील आरोपांवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोपलवार यांच्या वर एवढे गंभीर आरोप होत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांना झोप येते तरी कशी असा हल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी चढवला. तर मोपलवार यांना निलंबित केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी दिला. यावर मुख्यमंत्र्यांनी मोपलवार यांच्यावरील आरोप हे आघाडी सरकारच्या काळातीलच आहेत असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला. मोपलवारांवरील आरोपांची एक महिन्यात चौकशी करू अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
भ्रष्टाचारात आंकठ बुडालेले : विखे
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल करत, मोपलवार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले असून, त्यांनी विदेशामध्ये बेकायदेशीरपणे पैसा पाठवला असल्याचा आरोप विखे यांनी केला.या संभाषणात मोपलवार 10-10 कोटींच्या व्यवहारांचा उल्लेख अगदी सहजपणे करीत आहेत. त्यामुळे त्यांनी आजवर शेकडो कोटी रूपयांची उलाढाल केली असावी, असे प्रश्नचिन्ह विखे यांनी उपस्थित केले.
सत्ताधार्यांचा सभात्याग
महाराष्ट्र विधीमंडळाच्या इतिहासात सत्ताधार्यांनी सभात्याग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसच्या आमदारांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि मोपलवार यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधार्यांना घेरले होते. सत्ताधार्यांकडे उत्तर नसल्यामुळेच त्यांनी सभागृहातून काढता पाय घेतल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.