Breaking News

11 लाख मतदारांची नावं कुठे, स्थायीचे महापालिकेला चौकशीचे आदेश

मुंबई, दि. 01 - मुंबई महापालिकेच्या मतदारयादीतील 11 लाख जणांची नावं गहाळ झाल्याच्या प्रकरणाचे पडसाद स्थायी समितीतही उमटले आहेत. स्थायी समितीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत मोठा घोळ कसा झाला, तसंच 11 लाख मतदारांची नावं कुठे गेली, याची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समितीनं मुंबई महापालिका प्रशासानाला दिले आहेत. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत यासंबंधी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.
मतदार यादीतून मराठी नावंच वगळली गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर मतदार यादीत घोळ झाला नसता तर बहुमत आमचंच असतं, असा दावा भाजपने केला आहे. मतदार यादीतील घोळ प्रकरणावर भाजपच्या दिलीप पटेल यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा घेतला होता.