रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांचा राजीनामा
नवी दिल्ली, दि. 24, ऑगस्ट - उत्तर प्रदेशातील खतौली आणि ओरेया रेल्वे अपघातांनंतर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मित्तल यांनी आपला राजीनामा रेल्वेमंत्र्यांकडे सोपविला असून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. दोन आठवड्यांमध्ये झालेल्या दोन्ही दुर्घटनांमुळे विरोधी पक्षांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
शनिवारी मुजफ्फरनगर जिल्ह्यातील खतौलीमध्ये कलिंग-उत्कल एक्सप्रेस दुर्घटनेमध्ये 22 जणांचा मृत्यू तर 200 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. ही घटना नुकतीच घडलेली असतांना आज सकाळी पुन्हा कैफियत एक्स्प्रेस 12 डबे रूळांवरून घसरल्याने 75 प्रवासी जखमी झाले. रेल्वे अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे हे दोन्ही अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.