बोको हराम संघटनेकडून 83 नायजेरियन मुलांचा मानवी बॉम्ब म्हणून वापर - युनिसेफ
नवी दिल्ली, दि. 24, ऑगस्ट - बोको हराम या दहशतवादी संघटनेने 83 नायजेरियन मुलांचा वापर मानवी बॉम्ब म्हणून केल्याचा गौप्यस्फोट युनिसेफने केला आहे . जानेवारीपासून आतापर्यंतच्या कालावधीत या मुलांचा मानवी बॉम्ब म्हणून वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 83 मुलांमध्ये 15 वर्षाखालील 55 मुलींचा समावेश असल्याचे युनिसेफच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बोको हरामच्या तावडीतून पळ काढण्यात काही मुलांना यश आले आहे. ही मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात परत येण्याचा प्रयत्न करत आहेत. नायझेरियामध्ये मोठ्या प्रमाणावर कुपोषणाची समस्या असल्यामुळे 17 लाख नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे.