नागपुरात विजेचा धक्का लागून मजुराचा मृत्यू
नागपूर, दि. 28, ऑगस्ट - घराचे बांधकाम करताना उच्चदाब विजेचा धक्का लागून मजुराचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा औद्योगिक वसाहतीतल्या डिगडोह येथे ही घटना घडली. रमेशकुमार पंधरे असे मृत मजुराचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील सिवनीचा रहिवासी आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी घर मालकाला अटक केली आहे. नागपुरात उच्चदाबाच्या वीज वाहिनीचा शॉक लागून मृत्यूची ही अलीकडलच्या काळातील ही तिसरी घटना आहे.
या संदर्भात प्राप्त माहितीनुसार दीपक सोमेश्वर भौरदार (रा. नारायण अपार्टमेंट, बजाजनगर) याचे डिगडोह विद्यापती नगरातील भूखंडावर घराचे बांधकाम सुरू होते. घरावरून अगदी तीन फुटावर उच्चदाबाची वीजवाहिनी गेली आहे. तरी सुध्दा भौरदार त्याने धोका पत्करून विद्युत वाहिनीच्या नजीक घराचे बांधकाम केले. या निर्माणाधिन घराच्या गच्चीवर संरक्षण भिंत बांधली जात होती. रमेशकुमार पंधरे हा ते काम करीत होता. त्याचवेळी त्याला विजेचा धक्का लागून तो दूर फेकला गेला. दीपकने त्यास लता मंगेशकर रुग्णालयात नेले. तिथे त्याला सोडून तो पळून गेला. त्याने पोलिसांनाही घटना कळवली नाही. तेथील डॉक्टरने तपासून रमेशला मृत घोषित केले. रुग्णालयातील कर्मचार्यांनी मृत तरुणाच्या नातेवाईकाचा शोध घेतला. पण कुणीच समोर न आल्याने त्यांनी एमआयडीसी पोलिसांना हे कळविले. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केल्यानंतर त्यांना या घटनेची माहिती मिळाली. धोकादायक काम असल्याचे माहिती असूनही आरोपी दीपकने संरक्षणात्मक खबरदारी न घेता हे काम मजुरास करायला लावले. भारतीय दंड विधानाच्या कलम 304, 201, 176, 34 अन्वये आरोपी दीपक सोमेश्वर भौरदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.