Breaking News

“बेटी बचाओ, बेटी पढाओ’’ उपक्रमात सहकार्य फाऊंडेशन नेहमीच कटिबद्ध

बुलडाणा, दि. 08 - गेल्या दोन वर्षांपासून अग्रक्रमाने हाती घेतलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रमाअंतर्गत सहकार्य फाऊंडेशनने मागच्या वर्षी गणेश उत्सवादरम्यान पेठ येथील नवजात मुलीच्या नांवाने हिरकणी ठेव जमा केली होती. तेव्हापासून सुरूवात झालेल्या या उपक्रमाला गती देत यावर्षी रक्षाबंधनाचे औचित्त्य साधून आज दिनांक 7 ऑगस्ट 2017 रोजी नवजात मुलीच्या नांवे 5500/-रुपयांची हिरकणी ठेव ठेवण्यात आली. या मुलीच्या नांवे ठेव जमा करण्याकरिता मुलीची आजी शांताबाई सास्ते यांचेसुद्धा सहकार्य लाभले आहे. 
याबाबत असे की, बुलडाणा जिल्ह्यातील मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असून मुलीचा जन्मदर कमी झालेला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यावर उपाय म्हणून सहकार्य फाऊंडेशनने आपला खारीचा वाटा उचलला आहे. शक्य तेवढ्या मुलींच्या नांवे ठेव ठेवून मुलीचा जन्मदर वाढविण्याला हातभार लावण्याचे महत्त्वपूर्ण व पवित्र कार्य सहकार्य फाऊंडेशनने हाती घेतले आहे.  हिरकणी उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा तसेच हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या  अध्यक्षा सौ. वृषालीताई बोंद्रे, नगर परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ.अर्चनाताई खबुतरे, विवेकानंद क्लासेसच्या संचालिका सौ.शुभांगी इरतरकर यांच्या हस्ते सदर ठेव ठेवण्यात आली. चिखली येथील शिवानी गजानन सास्ते या नवजात मुलीच्या नांवे ठेव बँकेत ठेवण्यात आली. सदर कार्यक्रमाचे संचलन सुचित भराड यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकांत सोळंकी यांनी केले. यावेळी सहकार्य फाऊंडेशनचे प्रा.नितीन वराडे, निलेश भुसारी, चेतन नागवानी, पंकज भारद्वाज, श्रेयश हरलालका, विजय म्हस्के, विनायक हरलालका यांच्यासह बँकेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.