Breaking News

जिल्हा आरोग्य अधिकारी यांची बदली करण्यासाठी आ.रायमुलकरांना निवेदन

बुलडाणा, दि. 08 - बुलडाणा जिल्हा परिषद येथे जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. शिवाजी पवार हे गेल्या दोन वर्षापासून कार्यरत आहे. त्यांनी आपल्या जिल्ह्यात उत्कृष्ठ प्रकारचे काम केले असुन त्यांच्या या कामाचा जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनी वेळोवेळी गौरवसुध्दा केलेला आहे. 3 ऑगस्ट रोजी त्यांच्या बदलीचे आदेश शासन स्तरावरुन झाले आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातून एक चांगला अधिकारी त्यांचा प्रशासकिय बदलीचा कालावधी पुर्ण होण्याआधिच बदलुन जाणे म्हणजे आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना दज्रेदार सेवा घेण्यापासून वंचित ठेवल्यासारखेच होईल. त्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकार्याची आपल्या जिल्ह्यास अत्यंत आवश्यकता असल्याने आपण शासन दरबारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची बदली रद्द करुन घ्यावी, अशा मागणीचे निवेदन आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी निवेदन सादर करतांना तालुका आरोग्य अधिकारी मेहकर डॉ.सरपाते, डॉ.डी.एस. होणे, डॉ. प्रविण निकस, डॉ.उमेश निमदेव, एस.वाय. पर्हाड, डी.वाय. वायाळ, बी.आर. काकडे, के.यु. धोटे, आर.टी. चांगाडे, एस.के. शिंदे, जगताप, एस.जे. मिटकरी तथा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.