Breaking News

महानगराच्या मध्य भागातील दारुची दुकाने बंद करा!

बुलडाणा, दि. 08 - केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने हायवे च्या लगतची दारू दुकाने बंद केली आहेत .मात्र आता अशी दुकाने महानगराच्या मध्य भागात सताड उघडल्या जात असून प्रशासनाने नागरिकांची व महिलांची मागणी लक्षात घेता ही सुरु करण्यात आलेली नवीन दारूची दुकाने कायमची बंद करंण्याची मागणी  एमपीजे या सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी यांना सोमवारी निवेदन देऊन केली. 
दाबकी रोड व  छोट्या पुलाजवळील लहरीया कंपाउंड,लकडगंज परिसरात मध्य वस्तीत नवीन दारूची दुकाने नुकतीच सुरु झाली आहेत.हा परिसर नेहमी वर्दळीचा व मिरवणुकीचा आहे.नुकत्याच थाटलेल्या दारू दुकानाचा असह्य त्रास परिसरातील महिला -युवतींना होत असून यामुळे सामाजिक शांतता भंग होत आहे.यामुळे परिसरातील कोवळी मुले ही दारूच्या अधीन होऊन व्यसनाधीन पिढी निर्माण होण्याची शंका पालकवर्गात व्यक्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.प्रशासनाने या दुकानांची मंजुरात त्वरित रद्द करावी अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवडण्यात देण्यात आला.
एमपीजेचे जिल्हा अध्यक्ष मो. अतिकुर रहेमान, महानगर अध्यक्ष शहजाद अन्वर यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या या निवेदन प्रसंगी ख्वाजा इम्रान, सय्यद अक्रम ,मेहमूद उस्मान, अझर चौधरी, अकील बेग, मो.सिराज, जमीरोद्दीन, सय्यद जाकीर, अब्दुल रिजवान, मो. नदीम समवेत बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.