Breaking News

अमेरिकन ओपन : पात्रता फेरीतच भारताचे पुरूष एकेरीतील आव्हान संपुष्टात

न्यूयॉर्क, दि. 28, ऑगस्ट - पुरूष एकेरीत युकी भांबरी आणि प्रज्नेश गुणस्वरन यांच्यापाठोपाठ रामकुमार रामनाथन याचाही अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या  पात्रता फेरीत पराभव झाल्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. रामकुमार रामनाथनला फ्रान्सच्या निकोलस माहुत याने 3-6,  7-6(5), 2-6 असे पराभूत केले. केवळ 29 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिला सेट माहुतने जिंकला, तर दुसरा सेट रामनाथनने जिंकला. अखेर तिसरा  आणि निर्णायक सेट जिंकून माहुतने रामनाथनचा पराभव केला.