Breaking News

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला अमोल कोतकरचा जामीन अर्ज

अहमदनगर, दि. 28, ऑगस्ट - संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणार्या अशोक लांडे खूुन प्रकरणी नाशिकच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अमोल  भानुदास कोतकर याने जामिनासाठी केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने कोतकरला दिलासा मिळण्याचा अखेरचा प्रयत्न ही फोल ठरला  आहे.शेवगावमधील मूळ रहिवासी असलेल्या अशोक ल लॉटरी विक्रेता युवकाचा 2008 साली खून करण्यात आला होता.काँग्रेसचे तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष  भानुदास कोतकर,तत्कालीन महापौर संदीप कोतकर,सचिन कोतकर ,अमोल कोतकर व वाहनचालक अजय गायकवाड यांनी लांडे याला भर रस्त्यावर प्रचंड मारहाण  केली होती.या मारहाणीत लांडे याचा मृत्यु झालाहोता.मारहाणीच्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले शंकर राऊत व त्यांच्या पत्नी पार्वती राऊत यांनी या  प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने भानुदास कोतकर व त्याची तीन मुले अशा चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली  आहे.नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात चारही आरोपी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.नाशिक च्या सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या विरूध्द आरोपींनी मुंबई  उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.मात्र उच्च न्यायालयाने नाशिक जिल्हा न्यायालयाचे निकालपत्र तसेच अन्य कागदपत्रे व पुरावे पाहिल्यानंतर चारही  आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले होते.दरम्यान चार आरोपींपैकी एक आरोपी अमोल कोतकर याने माफीच्या अर्जासहीत जामीन मिळविण्यासाठी सर्वोच्च  न्यायालयात अर्ज दाखल केला होता.सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी अमोल कोतकर याच्या वतीने प्रसिध्द वकील कपिल सिब्बल यांच्यासह 7 प्रमुख वकील  नेमण्यात आले होते.मात्र सुनावणी नंतर सर्वोच्च न्यायालयाने अमोल कोतकर याने जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या  निर्णयाने कोतकरला चांगलाच झटका बसला आहे.