Breaking News

एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने पूर्ण केले झेलांचे शतक

कोलंबो, दि. 28, ऑगस्ट - श्रीलंकेविरूद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात आज रोहित शर्माने 100वा झेल टिपला आणि एकदिवसीय क्रिकेटमधील झेलांचे  शतक पूर्ण केले. रोहित शर्मा स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना कुशल मेंडीसच्या बॅटची कड लागून चेंडू वेगाने स्लीपमध्ये गेला. त्यावेळी अत्यंत चपळाईने रोहितने  दोन्ही हातांनी झेल घेतला आणिं 100 झेल पूर्ण केले. गेले काही दिवस स्लीपमधील क्षेत्ररक्षण ही भारतीय संघासाठी चिंतडची बाब होती, मात्र आता हळूहळू त्यात  सुधारणा दिसत आहे.