Breaking News

वैद्यकीय व्हिसा मंजूर केल्यामुळे पाकिस्तानी महिलेने मानले स्वराज यांचे आभार

नवी दिल्ली, दि. 22, ऑगस्ट - पाकिस्तानमधील एका बालकाच्या उपचारासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी वैद्यकीय व्हिसा मंजूर केल्यानंतर मुलाच्या  आईने स्वराज यांचे आभार मानले आहेत. या महिलेने ट्वीटरवर आपल्या लहान मुलाच्या छायाचित्रासह स्वराज यांचे आभार मानले आहेत.
पाकिस्तानमध्ये राहणारी लता शारदा यांनी एका नातेवाईकाला वैद्यकीय व्हिसा मंजूर करण्याची विनंती परराष्ट्रमंत्री स्वराज यांच्याकडे मागील महिन्यात केली  होती.याची दखल घेत स्वराज यांनी या कुटुंबाला वैद्यकीय व्हिसा मंजूर केला होता. शारदा यांच्या नातेवाईकाचा लहान मुलगा अस्थिमज्जेच्या आजाराने ग्रस्त  होता. या आजारावर भारतात उपचार करण्यात येणार होते. त्यासाठी या परिवाराला वैद्यकीय व्हिसाची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.