कंत्राटी कामगारांच्या वेतन समस्येवरून काम बंद आंदोलनाचा इशारा
नवी मुंबई, दि. 22, ऑगस्ट - विविध विभागांतील सर्व कंत्राटी कामगारांना किमान वेतन न दिल्यास 21 सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा समाज समता कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर गजभिये यांनी पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांना आज दिला. या संदर्भातील एक निवेदन त्यांनी आयुक्तांना दिले आहे.
नवी मुबंई महानगरपालिकेतील विविध विभागांत सुमारे 6 हजाराहून अधिक कंत्राटी कामगार आहेत; मात्र केवळ घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू करण्यात आले आहे. प्रत्यक्षात महासभेने सर्व कामगारांना मे 2017 रोजी किमान वेतन लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या ठरावानुसार फेबु्रवारी 2015 रोजी पासुनच्या वेतनातील थकित फरकाची रक्कम व उर्वरित विभागातील कामगारांना श्रेणी निहाय किमान वेतन देण्याची सूचना केली होती. असे असतांना प्रशासनाकडून या प्रकरणी विलंब होत असल्याने आज कामगार संघटनेच्या कामगारांना मनपा मुख्यालया समोर द्वार सभा घेऊन प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर आयुक्तांना एक निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की, नवी मुबंई महानगरपालिकेतील सर्व कामगारांना रजारोखी करणाची रक्कम व बोनसची रक्कम श्रेणी निहाय सुधारीत दराने म्हणजेच अकुशल कामगारांना रजारोखी करणाची रक्कम साधारण 12012 व बोनसचे 14292 एकूण 26304 प्रमाणे मिळावे. घन कचरा व्यवस्थापन विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्ये कामगारांच्या 4 टक्के गॅ्रज्युटीची रक्कम दरमहा 572 रूपये व 1 टक्के रजेचा पगार दरमहा 143 रूपयांचा समावेश करून एकूण रकमेमध्ये 715 रूपयाची वाढ करावी. घन कचरा व्यवस्थापन अंर्तगत सुपरवाईझर हे पदच नसल्यामुळे बेकायदेशीर 240 सुपरवाईझरांना त्यांच्या मुळ पदावर म्हणजेच सफाई कामगार नेमण्यात यावे. जेणे करून प्रशासनाचे 48,08,400.00 रूपये दरमहा बचत होतील व साफ सफाई कामात अजून चांगली सुधारणा होईल. सर्व कामगारांना प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या आत रेखांकित धनादेशाद्वारे वेतन मिळावे. सर्व कामगारांना दरमहा वेतन स्लिप मिळावी. कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ती कारवाई न केल्यास 11 सप्टेंबर रोजी किल्ले गावठाण येथे रस्ता रोको आंदोलन आणि दिनांक 21. सप्टेंबर रोजी पासुन बेमुदत सामुहीत रजा आंदोलन करण्यात येईल असा इशारा गजभिये यांनी दिला आहे.