Breaking News

नांदेड -लातूर मार्गावर टेम्पो, जीपच्या धडकेत तीन ठार


नांदेड, दि.30  नांदेड -लातूर मार्गावर मुसलमानपाटीजवळ भरधाव वेगात चाललेल्या टेम्पोने समोरून येणार्या जीपला धडक दिल्याने तीनजण जागीच ठार झाले. चार जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. आज (मंगळवार) दि. 29 रोजी दुपारी ही घटना घडली. नांदेड येथील पाटबंधारे विभागाची जीप क्रमांक एमएच26 सी 4703 घेवून वाहनचालक निवृत्ती तुकाराम वाघमारे वय 55 हे कंधारच्या दिशेने चालले होते. त्याचवेळी लोह्याकडून समोरून येणारा टेम्पो क्रमांक एमएच 22 एए491 हा याने भरधाव वेगात समोरून जीपला जोरदार धडक दिली. यात जीपच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. या धडकेमुळे वाहनचालक वाघमारे व जीपमधील मुद्रिका दत्ता नागरगोजे वय 60, मच्छिंद्र माधव नागरगोजे वय 10 राहणार घुगेवाडी ता. कंधार हे ठार झाले. याशिवाय नालेश्‍वर येथील नानाराव विठ्ठलराव वाघ वय 45, भीमराव ग्यानोजी वाघ वय 59, लोहा तालुक्यातील रमनेवाडी येथील दत्ता नागोराव केंंन्द्रे वय 52, सौ. शिवकांता दत्ता केंद्रे हे गंभीर जखमी झाले. या जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पोचालक फरार झाला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.