Breaking News

दोन मुलींच्या मृत्यूनंतर कुटुंबातील आणखी 6 मुलींना स्वाईन फ्लू झाल्याचा संशय


बीड, दि.30 माजलगाव तालुक्यातील पुरूषात्त
मपुरी येथील थोरात कुटुंबातील प्रीती थोरात वय 5 वर्षे व अपेक्षा थोरात वय 3 वर्षे या दोन मुलींचा स्वाईन फ्ल्यूने अवघ्या दहा दिवसात बळी घेतल्यानंतर आता याच कुटुंबातील आणखी सहा जणींना सर्दी, खोकला, उलटी, ताप अशाप्रकारचा स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असणारा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे., या सर्व मुलींना सोमवारी रात्री बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नंदिनी आबासाहेब थोरात, स्नेहल रघुपंत थोरात, तेजस रघुपंंत थोरात, आरती आबासाहेब थोरात, कल्पना बाबासाहेब थोरात, उर्मिला बाबासाहेब थोरात अशी या आजारी असलेल्या मुलींची नावे आहेत. या सर्व मुलींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.