Breaking News

इंद्रायणी नदीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

पुणे, दि. 01, ऑगस्ट - इंद्रायणी नदीत कुंडमळा येथे नदीपात्रातील धोकादायक दगडावर उभे राहून छायाचित्र काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. या दगडावर  छायाचित्र काढताना पाय घसरल्याने हा तरुण पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना घडली आहे.
अतुल दशरथ पाटील (वय 25 वर्षे) असे या तरूणाचे नाव आहे. तो पिंपरी चिंचवड येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये एमईचे शिक्षण घेत होता. याठिकाणी  तरुणाने घेतलेली धोकादायक उडी (स्टंट) कैमेर्‍यात कैद झाली आहे. तळेगाव पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत.