दहीहंडीचा वाद सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाकडे, 7 ऑगस्टला सुनावणी
मुंबई, दि. 01, ऑगस्ट - दहीहंडीची उंची वाढवण्याबद्दलच्या याचिकेला सुप्रीम कोर्टानं हायकोर्टात परत पाठवलं आहे. त्यामुळे दहीहंडी संदर्भातील यापुढील सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांप्रमाणे 7 ऑगस्टला दहीहंडी प्रकरणावर सुनावणी होणार आहे. दहीहंडीवेळी होणारे अपघात लक्षात घेता 2014 साली हायकोर्टानं दहीहंडीची उंची 20 फुटांहून कमी आणि गोविंदांचं वय 18 वर्षांहून कमी ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र दहीहंडी आयोजकांनी यावर नाराजी व्यक्त करत कोर्टात धाव घेतली होती.
सुप्रीम कोर्टात 18 दहीहंडी मंडळांनी कोर्टाचा आदेश मानण्यास नकार देत याचिका दाखल केली होती. या मंडळांनी सुरक्षेची खबरदारी घेऊ, पण आम्हाला दहीहंडीची उंची वाढवण्याची परवानगी द्यावी अशी कोर्टाला विनंती केली होती. दहीहंडीची उंची कमी केल्यामुळे ती खेळण्याचा आनंद कमी झाल्याचं याचिकेत सांगण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टानं याचिकेवरील सुनावणीवेळी 10 जुलैला दहीहंडी खेळताना घेतल्या जाणार्या सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यावर आज सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र राज्य सरकारनं दहीहंडीवेळी घेतली जाणारी काळजी पुरेशी असल्याचं स्पष्ट केलं. तसंच राज्यात दहीहंडीला फार महत्त्व असल्याचंही सांगितलं. 12 वर्षांवरील मुलं या दहीहंडीमध्ये सहभागी होऊ शकतात असंही स्पष्ट केलं आहे.