Breaking News

वस्तू व सेवाकराविषयी शंकासमाधानासाठी गणेशोत्सवात संवाद पर्व

औरंगाबाद, दि. 28, ऑगस्ट - शासनाच्या योजना अधिकाधिक जनतेपर्यंत पोहसाठी शासन विविध उपक्रम राबवित असते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून  गणेशोत्सवाच्या काळात ‘संवाद पर्व’ हा विशेष उपक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वस्तु व सेवा कर या  विषयावर जी.एस.टी. च्या सहआयुक्त श्रीमती दीपा मुधोळ ह्या व्यापार्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. हा कार्यक्रम दि. 28 ऑगस्ट रोजी  दुपारी 4 वा. कुलस्वामीनी मंगल कार्यालय, एन -6, सिडको येथे होणार आहे. तरी या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाचा जास्तीत जास्त व्यापार्यांनी व जनतेने लाभ घेण्याचे  आवाहन जिल्हा माहिती कार्यालय आणि सिडको व्यापारी गणेश महासंघाचे अध्यक्ष नितीन खरात, कार्याध्यक्ष नितीन अजमेरा, सचिव विलास कोरडे, स्वागताध्यक्ष  विजय शिंदे, उपाध्यक्ष बद्रिनाथ ठोंबरे, बाळासाहेब राजणीकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.