Breaking News

टेकुळ्याच्या भाजीतून धनगरमोहा येथील पाच जणांना विषबाधा

परभणी, दि. 28, ऑगस्ट - टेकुळ्याची भाजी खाणे गंगाखेड तालु धनगरमोहा येथील पठाण यांच्या घरातील सर्वांना चांगलेच महागात पडले. या भाजीमुळे या एकाच  कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याने त्यांना शनिवारी रूग्णालयात दाखल करावे लागले. आता त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  टेकुळयाची भाजी पठाण कुटूंबातील जमाल खान पठाण, हमीदाबी जमालखान पठाण, शकीलाबी जमालखान पठाण, सुजातबी जमाल खान पठाण, मुस्कानबी जमाल  खान पठाण या पाच जणांनी खाल्ली़ भाजी खालल्यानंतर शनिवारी सायंकाळी 5़30 ते 6 च्या सुमारास त्यांना उलट्या व जुलाब सुरू झाल्याने त्यांना गंगाखेड येथील  उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले़ वैद्यकीय अधिकारी डॉ़ केशव मुंडे, परिचारिका संगीता लटपटे, राजेंद्र गायकवाड, हरंगुळ आरोग्य  उपकेंद्राचे शेख खाँजा यांनी त्यांच्यावर उपचार केले़.