औरंगाबाद, दि. 22, ऑगस्ट - औरंगाबाद महापालिकेच्या सभेत ’वंदे मातरम’ या गीताच्या वेळी उभे न राहुन ’वंदे मातरम’चा अवमान करणा-या त्या दोन नगरसेवकांना एमआयएमने नोटीस बजावली असून कॉग्रेस पक्षानेही त्यांचे नगरसेवक सोहेल शेख यांना समज दिली आहे.या पुढे नेहमीच ’वंदे मातरम’चा आदर करावा असेही या पक्षाने म्हटले आहे.दरम्यानया घटनेच्या पार्श्वभूमिवर पुण्यातील वंदे मातरम संघटनेचे शिष्टमंडळ शहरात आले होते. काही कारणाने त्यांची महापौर बापु घडामोडे यांची भेट होऊ शकली नाही, असे बापु घडामोडे यांनी सांगितले. मात्र त्यांनी महापालिकेत घडलेल्या घटनेची चौकशी करून संबंधित नगरसेवकांवर काठोर कारवाईची मागणी केली आहे.