अदिबा आरिफ खान हीचा वज्र वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराने गौरव
नाशिक, दि. 22, ऑगस्ट - नाशिकच्या लिटील किंगडम शाळेत सिनीयर केजी मध्ये शिकणारी 5 वर्षीय अदिबा आरिफ खान हिने कोणाचीही मदत न घेता दि. 26 जानेवारी 2017 रोजी 40 गिर्यारोहकासोबत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेले कळसुबाई सर केले. व ध्वजवंदन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. याची दखल घेत आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील वज्र वर्ल्ड रेकोर्ड या पुरस्काराने अदिबाचा गौरव करण्यात आला असून तीच्या शाळेत व परिसरात कौतुक होत आहे. एवढ्या कमी वयात मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे अदिबा खान हिचा सत्कार केला.
दि.26 जानेवारी 2017 रोजी भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र नाशिक व नाशिकच्या मार्क मार्शल आर्टस जाती सलोखा मनुष्यहितकारी पक्ष या संस्थेने 40 गिर्यारोहकांना सोबत घेत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या 40 गिर्यारोहकांसोबत अदिबा आरिफ खान ही 5 वर्षीय मुलगी सहभागी झाली होती. सदर शिखरावर चढण्यात सकाळी 8.30 ला सुरुवात केल्यानंतर केवळ 3 तासात वेळ 11.30 वाजता हे सर्व गिर्यारोहक शिखरावर पोहचले. त्यानंतर त्यांनी याठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. सदर प्रवासात अदिबा हिने कोणाचीही मदत न घेता हे शिखर चढले. त्याबद्दल तीचे कौतुकही झाले होते.
अदीबा हिच्या या साहसाची दखल घेत आंध्र प्रदेशातील, विशाखापट्टणम येथील वज्र वर्ल्ड रेकोर्ड पुरस्काराने तिचा गौरव करण्यात आला. तिच्या या कर्तुत्वाची दखल घेत देशाच्या 70 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी तिचा प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान केला. तसेच अदिबा ने इथेच न थांबता मोठ मोठी शिखरे सर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.