Breaking News

उत्तर आणि पूर्व भारतातील मॅकडोनाल्डची 169 दुकाने बंद होणार !

नवी दिल्ली, दि. 22, ऑगस्ट - मॅकडोनाल्ड इंडियाने कॅनॉट प्लाझा रेस्टॉरंट्ससोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दिल्लीबरोबरच  उत्तर आणि पूर्व भारतातील मॅकडोनाल्डची 169 दुकाने बंद होणार आहेत. 
गेल्या काही महिन्यांपासून कॅनॉट प्लाझा रेस्टॉरंट लिमिटेड आणि मॅकडोनाल्ड इंडियामध्ये वाद सुरु होता. या वादानंतर मॅकडोनाल्डकडून हा निर्णय घेण्यात  आला आहे. 169 दुकाने बंद झाल्यास हजारो कर्मचा-यांसह मॅकडोनाल्डच्या वितरकांचेही आर्थिक नुकसान होणार आहे. यापूर्वीच मॅकडोनाल्डची 43  दुकाने बंद करण्यात आलेली आहेत.