Breaking News

दगडूशेठ हलवाई गणपतीची यंदा ब्रह्मणस्पती मंदिराची विशेष सजावट

पुणे, दि. 22, ऑगस्ट - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त  श्री. ब्रह्मणस्पती मंदिर साकारण्यात आले आहे. ऋग्वेदामध्ये आणि मुद्गल पुराणात गणेशाचा ब्रह्मणस्पती म्हणून प्रथम उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे  देवांचे अधिपती असलेल्या गणरायाला विराजमान होण् नागर, द्राविड आणि वेसर शैलीतील मंदिरांप्रमाणे गाणपत्य शैलीचे आगळेवेगळे मंदिर यंदा  साकारण्यात आले आहे. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10.9 वाजता प.पू. पीरयोगी श्री. गणेशनाथ महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.  तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष  अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
यावेळी हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, डॉ. बाळासाहेब परांजपे, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. शुक्रवारी ( 25 ऑगस्ट)  प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी 8 वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. यंदाच्या  ब्रह्मणस्पती मंदिराचा आकार 111 बाय 90 फूट असून 90 फूट उंची आहे. याशिवाय गोलाकार घुमटाखाली साकारलेला तब्बल 36 फुटी नयनरम्य गाभारा  हे वैशिष्टय असणार आहे. डेक्कन कॉलेजचे डॉ.श्रीकांत प्रधान आणि गाणपत्य प.पू.स्वानंद पुंड महाराज यांनी मुद्गल पुराणातून याविषयी शास्त्रशुद्ध माहिती  दिली आहे. त्याआधारे गणेशाची त्रिशूल, अंकुश, शंख, कमळ अशी अनेक आयुधे मंदिरावर लावण्यात आली आहेत. तर, हत्ती, मोर, गाय अशा विविध  प्राण्यांच्या शिल्पांनी मंदिरातील खांब सजविण्यात आले आहेत. सभामंडपाच्या छतावरील काचेच्या झुंबरांच्यावर रेखाटण्यात आलेली ब्रह्मणस्पती आणि गणेश  यंत्र हे खास आकर्षण असणार आहे. तब्बल 1 लाख 25 हजार मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांनी  मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.
गणेशोत्सवातील कार्यक्रमांबाबत बोलताना अशोक गोडसे म्हणाले, शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रपती, पंतप्रधान यांसह भारतरत्न, खेलरत्न,  सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री यांना श्रीं च्या दर्शनाकरीता आमंत्रण देण्यात  आले आहे. 26 ऑगस्ट रोजी पहाटे 6 वाजता षिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 25 हजार महिला सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. तर, रात्री  10 वाजता महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान दररोज  पहाटे 5 ते 6 यावेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. अनंत चतुर्दशीला श्रींची वैभवशाली सांगता मिरवणूक श्री धूम्रवर्ण रथातून  निघणार आहे. याबाबत 131 वर्षापूर्वी पुणे व सोलापुर येथे गणेश मुर्ती बसविण्यात आली होती. उद्या ते म्हणतील की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात  आम्ही केली. त्यामुळे गशोत्सवात वाद निर्माण करणे हे बरोबर नाही. गणेशोत्सव सर्वांसाठी टॉनिक आहे. हा उत्सव न राहता सामाजिक बांधिलकीच्या रूपाने  समोर यायला पाहिजे. आज निर्माण झालेला वाद संपुष्टात यायला हवा, असे श्रीमंत दगडुशेठ गणपती सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी  सांगितले.
50 कोटींचा विमा व उत्सवावर 150 कॅमेर्‍यांचा वॉच
पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा यांसह कॅम्प हद्दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल 50 कोटींचा विमा ट्रस्टतर्फे करण्यात आला आहे. यामध्ये अतिरेकी हल्ला वा  दुर्घटना झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात तसेच फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, दगडूशेठ  दत्तमंदिर, सिटीपोस्ट अशा परिसरात देखील सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमेर्‍यांचा वॉच उत्सवावर  असणार आहे. त्यामुळे तब्बल 150 कॅमेर्‍यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची 250 लोकांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.
40 किलो सोन्याचे नाविन्यपूर्ण सुवर्णालंकार
भक्तांनी श्रीं चरणी प्रतिवर्षी अर्पण केलेल्या सोन्यातून भक्तांचे भाव जपण्याकरीता शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्यानिमित्ताने नाविन्यपूर्ण अलंकार घडविण्यात  आले आहेत. आकर्षक नक्षीकाम, हत्ती शिल्प, मोरतुरे आणि नवग्रहांच्या समावेशासह 8 ते 10 हजार खडयांची सजावट असलेला 9.5 किलोचा मुकुट  बाप्पासाठी साकारण्यात आला आहे. रत्नजडित खडयांनी नटविलेला ग्रॅमचा शुंडहार, सुर्यांच्या किरणांचा आभास निर्माण करणारे 2 किलोचे कान, तब्बल 4  हजार सुवर्णटिकल्यांनी मीणाकाम करुन चंद्रकोराची आभास निर्मीती करणारा 2.5 किलोचा अंगरखा बाप्पाला अर्पण करण्यात येणार आहे. याशिवाय  कपडयावर खडेकाम असलेले 3.5 किलोचे उपरणे, 6.5 किलोचे सोवळे, पांढर्‍या खडयांचे कोंदण असलेला 1 किलोचा हार असे दागिने साकारले आहेत.