Breaking News

पंतप्रधान आवास योजने (शहरी) अंतर्गत महाराष्ट्राला 9,894 घरांना मंजूरी


नवी दिल्ली, दि. 29, ऑगस्ट - केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने पंतप्रधान आवास योजनेतंर्गत (शहरी) आज महाराष्ट्राला 9 हजार 894  परवडणारी घरे मंजूर करण्यात आली आहेत. या मंजूरीसह महाराष्ट्राला एकूण 1 लाख 44 हजार 165 घरे मंजूर करण्यात आली. यासाठी केंद्राकडून दोन हजार  224 कोटीं रूपयांची आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. त्याव्यतिरीक्त 15 हजार 868 कोटी रूपयांच्या गुंतवणूकीस मंजूरी देण्यात आली आहे.
20 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजनेची घोषणा केली होती. या योजनेतंर्गत सर्वांसाठी परवडणारे घरे बांधली जाणार आहेत. या  योजनेचे ग्रामीण आणि शहरी असे दोन गट करण्यात आले. आज प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या अंतर्गत आज महाराष्ट्रासाठी 9 हजार 894 घरांना मंजूरी  देण्यात आली.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने पंतप्रधान आवास योजनेतंर्गत (शहरी) आज महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तामिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात,  पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड या 10 या राज्यांसाठी निधी मंजूर केला आहे. या 10 राज्यांसाठी एकूण 26 लाख 13 हजार 568 घरे मंजूर केलेली आहेत.  यासाठी केंद्र शासनाकडून एकूण 40 हजार 597 कोटींची आर्थिक सहाय्यतेला मंजूरी मिळाली आहे, तर 1 लाख 39 हजार 612 कोटी रूपयांच्या निधी  गुंतवणूकीसही मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.