Breaking News

डिजिटल पेमेंट’ करणा-या ग्राहकांना जीएसटीतून 2 टक्के सूट देण्याचा सरकार विचार

नवी दिल्ली, दि. 29, ऑगस्ट - डिजिटल प्रणालीतून वस्तूची किंमत अदा करणा-या ग्राहकांना वस्तूंवर लावलेल्या वस्तू व सेवा करातून 2 टक्के सूट देण्यावर केंद्र  सरकार विचार करत आहे. रोख रकमेची परंपरा कमी करण्यासाठी दोन हजार रुपयांपर्यंतच्या डिजिटल पेमेंटवर सूट देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
सूट किंवा रोख रक्कम परत देण्याच्या स्वरूपात डिजिटल पेमेंटचा लाभ देण्याच्या प्रस्तावावर अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक, मंत्रिमंडळ सचिवालय आणि इलेक्ट्रॉनिक्स व  माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयांमध्ये चर्चा सुरू आहे. या माध्यमातून देशभरात रोख रकमेच्या व्यवहारावर आधारित अर्थव्यवस्था डिजिटल प्रणालीत रूपांतरित करणे हा  हेतू असून यातून छोट्या प्रमाणावर व्यवहार करणा-यांना लाभ होणार आहे.