Breaking News

नागपूर मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 5 डबे वाशिंदजवळ रुळावरुन घसरले

मुंबई, दि. 29, ऑगस्ट - नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 5 वातानुकूलित डबे सकाळी पावणे सातच्या दरम्यान आसनगाव-वाशिंद स्थानकादरम्यान घसरले. यात  अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे आसनगावच्या दिशेने येणार्‍या गाड्या टिटवाळ्यापर्यंतच सोडल्या जात असून आसनगावकडून मुंबईच्या दिशेने होणारी  वाहतूक पुढील सुचना मिळेपर्यंत बंद राहणार असल्याचे रेल्वेप्रशासनाकडून सांगण्यात आली आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांची व लांबपल्ल्याच्या गाड्यांची  वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दरम्यान नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेसचे पाच डबे ईमर्जन्सी ब्रेक लावल्यामुळे रुळावरून खाली घसरले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली  नाही. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.