Breaking News

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 8 व 9 ऑगस्ट रोजी पोलीस बंदोबस्त


पुणे,दि.8 : बईतील उद्याच्या मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईकडे जाण्याची शक्यता आहे. पुण्यासह आजुबाजूच्या जिल्ह्यातून मुंबईकडे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जाणारी वाहने कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई या द्रुतगती मार्गानेच जातील. या महामार्गावर नेहमीच सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ असते. यामध्येच मराठा मोर्चासाठी जाणारी वाहने आल्यास वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होऊन महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून कामाच्या निमित्ताने जाणार्‍या नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी 8 व 9 ऑगस्ट रोजी पोलीस विभागातर्फे आवश्यक तो पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे आणि इतर आवश्यक व्यवस्थाही करण्यात येणार आहे. त्यामुळे मोर्चात सहभागी होणार्‍या नागरिकांना सुलभतेने मुंबईला पोहोचता यावे यासाठी रोज प्रवास करणार्‍या नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून द्रुतगती महामार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.
मुं