Breaking News

पुण्यात स्वाईन फ्लूचे 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर


पुणे,दि.8 : शहरातील स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव सतत वाढतच चालला असून आज रोजी स्वाइन फ्लूचे 20 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या वर्षात आतापर्यंत या आजाराने 81 जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये पुणे शहरातील 24 तर पुण्याबाहेरील 57 नागरिकांचा समावेश आहे. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या आणखी 30 रुग्णावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 20 जणांनी प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
1 जानेवारीपासून आजपर्यंत शहरात तब्बल 5 लाख 546 जणांची स्वाईन फ्लूची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 हजार 10 हजार 500 संशयितांना टॅमी फ्लूचे औषध देण्यात आले आहे. तर आज दिवसभरात 2 हजार 458 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 126 जणांना टॅमी फ्लूचे औषध देण्यात आले आहे. नागरिकांनी आरोग्यांची काळजी घेऊन सर्दी व खोकला असेल, तर तातडीने सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.