दोनशे रुपयांची नवी नोट लवकरच चलनात येणार
नवी दिल्ली, दि. 24, ऑगस्ट - दोनशे रुपयांची नवीन नोट ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चलनात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून आज देण्यात आली. लवकरच या नवीन नोटा बँकामध्ये आणि एटीएममध्ये उपलब्ध केल्या जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बनावट नोटांना चाप लावण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रयत्न सुरू केले आहेत. 100 ते 500 रुपयांमध्ये कोणतीही नोट चलनात नाही.200 रुपयाच्या या नवीन नोटांमुळे नोटांची उपलब्धता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे.