पत्रकार राजदेव रंजन हत्याप्रकरणी शहाबुद्दीनसह 6 जणांविरोधात आरोपपत्र
पाटणा, दि. 23, ऑगस्ट - पत्रकार राजदेव रंजन हत्येप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन याच्यासह 6 जणांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणाची पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. आरोप पत्र दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अजहरुद्दीन बेग, रिशु कुमार जायसवाल, रोहित कुमार सोनी, विजय कुमार गुप्ता, राजेश कुमार आणि सोनू कुमार गुप्ता या सहा जणांचा समावेश आहे. 13 मे 2016 रोजी राजदेव रंजन या यांची पत्रकाराची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर बिहार पोलिसांनी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवले होते.